आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय उपक्रम:शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रेम निर्माण करण्याचा उद्देशाने लाखो बियांचे संकलन

खामगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत सामाजिक व पर्यावरणीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने व विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष प्रेम निर्माण करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून येथील टिळक राष्ट्रीय विद्यालयाचे वृक्षप्रेमी शिक्षक अरुण भगत व विद्यार्थी २०१४ पासून हा उपक्रम राबवत आहेत. परिसरातील वृक्षांच्या बियांचे संकलन करण्याचा उपक्रम राबवणारी विदर्भातील एकमेव शाळा असण्याचा शक्यता असल्याचे शिक्षक भगत यांनी यावेळी सांगितले.

आपल्याच परिसरातील बियांचे संकलन करून त्या बियांपासून रोपवाटिका तयार करण्याचा उपक्रम त्यांनी तत्कालीन संस्थेचे अध्यक्ष वृक्षप्रेमी मधुसूदन गाडोदिया, तत्कालीन उपाध्यक्ष अशोक झुनझुनवाल व आजचे विद्यमान अध्यक्ष सुधाकर अजबे यांच्यासमोर मांडला. यावेळी या उपक्रमाचे कौतुक करून शालेय परिसरातील बी संकलनास व रोपवाटिका तयार करण्यास प्रोत्साहन देण्यात आले. शाळेचा परिसर विस्तीर्ण आहे आणि शाळेच्या मालकीची जमीन पण अधिक प्रमाणात असल्यामुळे याठिकाणी अमलताश, रिठा, रामफळ, सीताफळ, कडूलिंब, शेवगा यासह विविध प्रकारच्या जातीची झाडे आहेत. गत आठ वर्षांच्या या कालावधीत या रोपवाटिकेत दहा हजारांच्या वर रोपे तयार करून त्यांचे विनामूल्य वाटप करण्यात आले आहे. मागील वर्षी रामफळ, सिताफळ, रिठा, शेवगा, जांभूळ, चारोळी, टेंबरून, मोह, बेल, करवंद, कइठ इत्यादी रोपांचे विनामूल्य वाटप केले. विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रेमी निर्माण होण्याकरता व त्यांचात पर्यावरणीय समतोलाची जाणिव निर्माण व्हावी, या हेतूने या उपक्रमाचे आयोजन शिक्षक अरूण भगत यांच्या कडून केल्या जाते.