आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रंगीबेरंगी छत्र्या, रेनकोटला महागाईचे ग्रहण ; रेनकोटच्या किमतीत 25 टक्क्यांची वाढ

खामगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाठयपुस्तके, वह्यांबरोबरच रेनकोट, छत्र्यांची खरेदी दुकानात पालक दिसून येत आहे. यंदा छत्र्यांच्या किंमतीत २० टक्के तर रेनकोटच्या किंमतीत २५ टक्के वाढ झाली आहे. दरवाढ झाली असली तरी याला पर्याय नसल्याने नागरिकांना अधिक पैसे देऊन छत्र्या व रेनकोट खरेदी करावे लागत आहे. यंदाच्या पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पावसापासून बचाव व्हावा यासाठी लोक रेनकोट, छत्रीचा वापर करतात. शहरातील मेन रोडसह विविध भागातील दुकानांमध्ये दर्शनी भागावर टांगलेल्या रंगीबेरंगी छत्र्या व रेनकोट नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

शेतातील साहित्याला पाऊस लागू नये शेतकरी ताडपत्री व प्लास्टिकचा वापर करतात. याचीही मागणी वाढली आहे. छत्र्यांचे दर २०० ते ३५० रुपये आहे. आठ काडी, बारा काडी, सोळा काडी छत्र्या बाजारात विक्रीकरिता आल्या आहेत. पावसाळ्यात लहानांपासून मोठ्या पर्यंत अनेक जण रेनकोटचा वापर करतात.

छत्र्यांच्या दरामध्ये सुमारे २० टक्क्यांनी वाढ छत्री तयार करण्यासाठी लागणाऱ्या लोखंडी काड्यासह प्लास्टिकचे दर वाढले आहे. वाढलेल्या दरामुळे यंदा बाजारपेठेत विक्रीस आलेल्या छत्र्यांच्या दरामध्ये सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे विक्रेता गजानन ठोसर यांनी सांगितले. प्लास्टिक पासून रेनकोट तयार केले जाते. शिवाय इतर राज्यातून रेनकोट मोठ्या प्रमाणात आयात केले जातात. पावसाळ्यात रेनकोटचे दर २५ टक्क्यांनी वाढले आहे. प्लास्टिकच्या दरामध्येही गत काही महिन्यामध्ये अधिक प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी प्लास्टिक पासून निर्माण केल्या जाणाऱ्या विविध साहित्याचे दर आता वाढल्याचे शहरातील प्लास्टिक विक्री करणाऱ्या व्यापारी वर्गाकडून सांगितले जात आहे.

ताडपत्री, प्लास्टिकचे दर वाढले प्लास्टिक महागल्याने ताडपत्रीचे दरही गगनाला भिडले आहे. ग्रामीण भागातील लोकांनी याची खरेदी सुरु केली आहे. शिवाय शेतातील माल झाकण्यासाठी ताडपत्रीची मागणी अधिक आहे. परंतु यंदा ताडपत्रीचे दरही १५ टक्क्यांनी वाढले आहे.

बातम्या आणखी आहेत...