आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई तत्काळ देण्यात यावी, तसेच भरपाई मधून वगळण्यात आलेल्या महसूल मंडळांचा समावेश करून मदत द्यावी, अशी या मागणी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी आज, दि. ३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांना पत्र दिले. सिंदखेडराजा मतदारसंघात अतिवृष्टी आणि सततच्या पावसाचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अाहे. शेतकऱ्यांना दि.३१ मार्चपर्यंतदेण्यातसर्वतोपरी मदतदेण्यात येईलअसे आश्वासन विधिमंडळात शासनाच्या वतीने देण्यात आले होते.
परंतु, शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. परंतु, देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगावमही, अंढेरा, देऊळगावराजा, तुळजापूर, मेहुणाराजा, लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द, बीबी, चिखली तालुक्यातील मेरा, शेळगाव आटोळ, तसेच सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा, शेंदुर्जन, सिंदखेडराजा, किनगावराजा, सोनोशी, दुसरबीड या महसूल मंडळांना अतिवृष्टीच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यांचाही अतिवृष्टी आणि सततच्या पावसाच्या नुकसानी मध्ये समावेश करण्यात यावा, तसेच शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या पत्राद्वारे केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.