आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आ.अॅड.आकाश फुंडकर यांच्या वाढदिवसानिमित्त ५ फेब्रुवारी रोजी आयोजित रक्तदान शिबिरात २२८ जणांनी रक्तदान केले. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. तर सर्वच स्तरातील मान्यवरांची उपस्थिती होती. भा.ज.यु.मो.व विद्यार्थी आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. ज्येष्ठ नेते साहित्यिक रामदादा मोहिते यांच्या हस्ते व भाजप सोशल मीडिया प्रदेश संयोजक सागर फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात झाले. शिबिरात २२८ कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.
यावेळी शत्रुघ्न पाटील, ओंकारआप्पा तोडकर, दर्शनसिंह ठाकूर, प्रमोद अग्रवाल, डॉ एकनाथ पाटील, संजय शिनगारे, शरदचंद्र गायकी, सुरेश गव्हाळ, चंद्रशेखर पुरोहित, गजाननराव देशमुख,संतोषसेठ डीडवानी, चंदुसेठ मोहता,महेंद्र रोहनकार, अनिता डवरे, अनिता देशपांडे, रेखा मोरे, रेखा जाधव, राजेंद्र धानोकार, सतीशअप्पा दुडे, अमोल अंधारे, विजय महाले, राकेश राणा, विनोद टिकर, शोहरत खान, तुषार गावंडे, राजेश तेलंग उपस्थित होते. आ.फुंडकर यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्वस्तरातील नागरिकांनी यावेळी गर्दी केली होती.
अन् दोन्ही रक्तपेढी फुल्ल आमदार अॅड.आकाश फुंडकर यांच्या वाढदिवशी रक्तदान करण्यासाठी सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. सामान्य रुग्णालय व सोनी ब्लड बँक या शहरातील दोन्ही रक्तपेढ्यांची चमू शिबिरासाठी हजर होती. २२८ जणांनी रक्तदान केले. अनेक जण वेटिंगवर होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.