आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:आ. गायकवाड यांच्या निषेधार्थ सिंदखेडराजात मोर्चा ; सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजित

सिंदखेडराजाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भरसभेत धुडगूस घालणाऱ्या बुलडाणा येथील आमदार संजय गायकवाड यांच्या झुंडशाही चा निषेध म्हणून तर शिवसेनेचे नवनियुक्त सह संपर्क प्रमुख छगनराव मेहेत्रे यांच्या समर्थनार्थ येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने निषेध मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता राजवाडा येथून निघालेला या मोर्चाचा तहसील कार्यालयात समारोप करण्यात आला. बुलडाणा येथे शिवसेनेच्या कार्यक्रमात मोठा राडा झाला. येथील शिवसेनेचे स्थानिक नेते व नवनियुक्त जिल्हा सहसंपर्क प्रमुख छगनराव मेहेत्रे यांना या कार्यक्रमात जातीवाचक शिविगाळ करून धमकी देण्यात आली होती. या घटनेचा सर्वत्र निषेध होत असताना मेहेत्रे यांच्या समर्थनार्थ शहरात या निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी आमदार गायकवाड यांच्या व त्यांच्या मुलांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. गायकवाड यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान,तहसीलदार यांना या विषयी निवेदन देण्यात आले. यावेळी झालेल्या सभेत बोलताना मेहेत्रे यांनी आम्ही कोणाच्या धमक्यांना घाबरणार नाही. जे लोक गद्दार आहेत त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल. मधमाशांचे मोहोळ कसे जाळतात हे आम्हाला सांगावे लागत नसल्याचेही ते म्हणाले. शहरातील सर्वपक्षीय, सर्वजातीय लोक या निषेध मोर्चात सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...