आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:विसर्जन मिरवणुकीतील देखाव्यातून समाज प्रबोधन ; टिळकांच्या हस्ते प्रारंभ

खामगाव / गिरीश पळसोदकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामध्ये विदर्भात सर्वप्रथम खामगावातील लक्कडगंज भागातील राष्ट्रीय सार्वजनिक गणेशोत्सवाचा समावेश आहे. या मंडळानंतर शहरात व विदर्भात सार्वजनिक गणेशोत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. लोकमान्य टिळक हे सन १९१५ मध्ये खामगावला आले होते. त्यांच्या हस्ते राष्ट्रीय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या या उत्सवाला प्रारंभ झाला.

या मंडळातील पदाधिकारी दरवर्षी बदलत असले तरी हा उत्सव आजतागायत मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जात आहे. ज्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक उत्सवाला प्रारंभ केला. त्या उद्देशाला तडा न जाऊ देता या मंडळातर्फे मागील १०७ वर्षांपासून हा दहा दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जात आहे. शहरातील नव्हे तर विदर्भातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असल्याचे सध्या हयात असलेले वृद्ध सांगतात. या मंडळाची कोणी स्थापना केली, या बाबत माहिती देणारे कोणी हयात नसल्यामुळे त्याचे नाव मात्र समजू शकले नाही. राष्ट्रीय गणेशोत्सव मंडळानंतर शहरात दरवर्षी हा उत्सव साजरा करणाऱ्या मंडळाच्या संख्येत वाढ होऊ लागली. आजमितीस शहरात लहान मोठे मिळून शंभरच्या आसपास गणेश मंडळे हा उत्सव साजरा करत आहे.

राष्ट्रीय मंडळानंतर तानाजी, हनुमान, रामदल या मंडळानी या उत्सवाला सुरुवात केली. राष्ट्रीय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे विघ्नहर्ता गणरायाच्या मूर्तीची पहिली स्थापना फरशी भागातील पुरणमल धर्मशाळेत झाली. परंतु काही कारणामुळे मुक्तेश्वर आश्रम, शीतला माता मंदिर, भगतसिंग चौकात हा उत्सव साजरा केला. स्व. बाजीराव बोबडे, स्व. भाटे, स्व. अॅड. अणेकर, स्व. शेकदार, स्व. बुरेखा कालेखाँ, स्व. मांडवगडे, स्व. भोरकर, स्व. दामजीभाई विकमसी, स्व. बुटासिंग, स्व. निरंजन सिंग, स्व. धनश्याम फुलारे, स्व. हनुमानदास अग्रवाल, स्व. डॉ. परसनीस, स्व. श्यामराव कुळकर्णी, स्व. कन्हेयालाल जोशी, स्व. शिवचरण अग्रवाल, स्व. वल्लभदास खंडेलवाल, जगदिश जोशी, किशोर इंगळे यांनी गणेशोत्सव मंडळाची धुरा सांभाळत उत्सव साजरा केला. यंदा लक्कडगंज भागातील राष्ट्रीय व्यायाम प्रसारक मंडळाच्या व्यायाम शाळेजवळ साडेनऊ फुटाच्या मूर्तीची स्थापना केली आहे.

यंदा हा उत्सव यशस्वी करण्यासाठी अमित फुलारे, बंटी पिंपळे, सतीश शमी, प्रताप थोरात, प्रतिक जोशी, करण फुलारे, अमनदीप सलुजा, शुभम शर्मा, सौरभ फुलारे, राहुल जोशी, अर्जुन शमी, संदीप गुळवे, शक्ती पिंपळे, लोकेश फुलारे, आकाश हिंगणे आदी मंडळाचे पदाधिकारी परिश्रम घेत आहे.

बातम्या आणखी आहेत...