आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस कमी:गतवर्षीच्या तुलनेत खामगावात यंदा 30.8 मि.मी. पाऊस कमी ; गतवर्षी 55 मि.मी. तर यंदा 24 मि.मी. पाऊस

खामगाव20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गतवर्षी २०२१ च्या पावसाळ्यात १३ जूनच्या सकाळी ८ वाजेपर्यंत एकूण ५५.४ मि.मी. तर यंदा २०२२ सालच्या १३ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत एकूण २४.६ मि.मी. पाऊस पडल्याची माहिती येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कडून मिळाली आहे. ही आकडेवारी पाहता गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३०.८ इतके मि.मी. पाऊस कमी पडला आहे. शहरासह तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये तीन दिवसांच्या कालावधीत कुठे कमी तर कमी जास्त असा पाऊस पडला आहे. गतवर्षी मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी ७ जुन रोजी २.२ मि.मी. पाऊस बरसला होता. तत्पूर्वी ४ जुन रोजी ४ मि.मी. तर त्यानंतर ९ जुन रोजी २८.६ तर १३ जूनच्या सकाळी ८ वाजेपर्यंत १९ मि.मी. असा एकूण ५५.४ मि.मी. पाऊस बरसला होता. तर यंदा मृग नक्षत्राच्या पहिल्या सरी ९ जूनच्या रात्री बरसल्या. १० जूनच्या सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या १२.४ मि.मी., १२ जून ४.२ मि.मी. तर १३ जूनच्या सकाळी ८ वाजेपर्यंत ८ मि.मी. असा एकूण २४.६ मि.मी. पाऊस बरसला. वरील आकडेवारी पाहता यंदा पाऊस कमी बरसला आहे. पडलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. १३ जूनच्या सकाळी ९ वाजता पासूनच ऊन जाणवू लागले. कडक ऊन तापू लागल्याने होणाऱ्या उकाड्याने शहरवासीय हैराण झाले आहे. आता शहरवासीयांना जोरदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. अनेक शेतकऱ्यांनी मोलामहागाईचे खते, बियाणे विकत घेतले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांजवळ सिंचनाची व्यवस्था आहे असे शेतकरी कापसाची लागवड करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तर काही शेतकऱ्यांची पावले आता बी-बियाणे खरेदी करण्यासाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे वळू लागली आहे.

वीज पडल्याने महिला जखमी तालुक्‍यातील घारोड येथे १२ जुन रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामध्ये वीज अंगावर पडल्याने मनिषा मिलींद इंगोले ही महिला जखमी झाली. या महिलेला जखमी अवस्थेत लाखनवाडा येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...