आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन’:‘रस्त्याचे काम पूर्ण करा; अन्यथा भीक मांगो आंदोलन’

चिखली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील नगर पालिका कार्यालय ते बाबुलॉज चौक रस्त्याचे अपूर्ण काम त्वरित पूर्ण करावे अन्यथा भीक मागो आंदोलन करण्यात येईल असा इशारा मिजान ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष तथा मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष उबेद अलीखान यांनी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांना दिला आहे.

नगर पालिका ते बाबूलॉज चौक रस्त्याचे काम करताना संबंधित ठेकेदाराने ६ फुट रस्ताचे काम जाणूनबुजून करण्याचे सोडले आहे. त्यामुळे रस्त्याच्या बाजुला मोठा गड्ढा पडला असून ६ फूट रस्ता सोडल्यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात वाहन त्यामध्ये जावून जीवित हानी होण्याची शक्यता आहे. तसेच रहदारीस अडथळा निर्माण होवून ट्रॉफीक वेळोवेळी जाम होत असल्याने त्याच त्रास नागरिकांना सहन करावा लगत आहे. त्यामुळे सदर काम पूर्ण करावे अन्यथा भीक मांगो आंदोलन करू, असा इशारा उबेद अलीखान यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...