आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्न सुटला:अळसना भुयारी मार्गावर गडर टाकण्याचे काम पूर्ण; प्रवाशांनी सोडला सुटकेचा श्वास

शेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अळसना जवळील रेल्वेगेटवर नेहमी जाम होणार्या वाहतुकी मधून प्रवाशासह सामान्य जनतेला सुटकारा मिळावा, यासाठी रेल्वे विभागाच्या वतीने त्या मार्गावर. अंडरपास मार्ग बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. त्या कामातील एक महत्वाचा भाग म्हणजे गडर टाकण्याचे काम असते. वेळेच्या आत हे गडर टाकण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे नागरीकांसह प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

मागील अनेक वर्षांपासून या मार्गावर नव्याने रस्ता करण्याची मागणी करण्यात येत होती. ही रेल्वे प्रशासनाने मान्य केल्याने या भुयार रस्त्याचे काम युध्द पातळीवर सुरू करण्यात आले आहे. लवकरच हा भुयारी मार्ग पूर्ण होईल अशी प्रवाशांना आशा आहे. शेगाव-आळसना मार्गावर असलेल्या रेल्वेगेट वरून प्रवास करणाऱ्या वाहन धारकांना अनेक वर्षांपासून या गेट वर अडकुन पडावे लागत होते. कधी कधी तासभर गेट उघडत नव्हते.

त्यामुळे यापासून सुटकारा मिळावा, अशी प्रवाशांची मागणी होती. या मागणीची दखल घेत रेल्वे विभागाने अंडरपास मार्ग बनविण्याचे काम हाती घेतले. हा अंडर ग्राऊंड मार्ग तयार होताच, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना व अळसना येथील ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासापासून लवकरच सुटका मिळणार आहे. एडिएन मीना, सीनियर सेक्शन इंजिनिअर सोनोने, अभिषेक कुमार, डीबी ठाकुर तर परिवहन निरीक्षक म्हणून मोहन देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गडर टाकण्याचे काम पूर्ण केले.

बातम्या आणखी आहेत...