आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापुरुषांबद्दल भाजपच्या मंत्र्यांकडून नियमित वादग्रस्त वक्तव्य करण्यात येत आहेत. याचा फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचकडून बुधवारी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत नरेंद्र मोदी यांना निवेदन देत वक्तव्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. निवेदनात नमूद आहे, की मागील काही महिन्यांपासून सतत जाणीवपूर्वक महापुरुषांचा अपमान केला जात आहे. प्रथम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून सावित्रीबाई फुले, म. फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले गेले. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी अभद्र वक्तव्य करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी लोकांकडे भीक मागितली असे वक्तव्य केले.
त्यामुळे बहुजन समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर योगेश म्हसाळ, ज्योती ढोकणे, डॉ. संदीप वाकेकर, प्रवीण तायडे, राजरत्न वाकोडे, राहुल वानखडे, राजीव भोंगाळे, गोपाल करंगळे, धनंजय बोंबटकर, संकेत रहाटे, रवींद्र दाते यांच्यासह बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.