आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ उपक्रम राबवा‎

बुलडाणा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिन्याच्या पहिल्या शनिवारी आपल्या स्वतःच्या मूळ गावात‎ जाऊन एक तास राष्ट्रवादीसाठी !आगामी महाराष्ट्राच्या‎ विकासासाठी ! हा उपक्रम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील‎ यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रामध्ये चालू आहे. या उपक्रमाच्या‎ माध्यमातून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मूळ‎ गावामध्ये सर्व गावकऱ्यांना व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना‎ बोलावून बैठक घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादीचे बुलडाणा‎ विधानसभा अध्यक्ष नरेश शेळके यांनी केले.‎ अंत्री तेली येथे एक तास राष्ट्रवादीसाठी कार्यक्रमाचे‎ आयोजन शनिवारी, करण्यात आले होते. यावेळी नरेश‎ शेळके बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सव अंत्री‎ तेलीच्या सरपंच इंदुबाई विलास शेळके तर प्रमुख उपस्थिती‎ जिल्हा उपाध्यक्ष बी.टी जाधव, जिल्हा सरचिटणीस पी .एम.‎ जाधव, माजी कृषी सभापती लक्ष्मी शेळके, महिला‎ आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष विजया कोळसे, महिला‎ तालुकाध्यक्ष मंगला वायाळ या होत्या. यावेळी शेळके म्हणाले‎ की, जनतेशी सुसंवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेऊन‎ सोडवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करावी आणि पक्षाचे कार्य,‎ व ध्येय धोरण सांगून पक्ष संघटना मजबूत करावी.

या‎ उपक्रमामुळे पक्ष नेतृत्वाची नाळ जनतेशी जुळत आहे. असा‎ हा स्तुत्य उपक्रम महिन्यातून एक वेळेस व स्वतःच्या मूळ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ गावापुरता मर्यादित न ठेवता नियमित व प्रत्येक गावात राबवू,‎ कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी. एम. जाधव यांनी केले. यावेळी‎ जिल्हा उपाध्यक्ष बी. टी. जाधव, उपसरपंच विजय सातपुते‎ ग्रामपंचायत सदस्य मुकेश तायडे यांनी ही आपले विचार‎ व्यक्त केले. कार्यक्रमासाठी माजी सरपंच ज्ञानेश्वर शेळके,‎ माजी सरपंच श्रीकृष्ण डुकरे, कृषी उत्पन्न बाजार समिती‎ संचालक प्रभाकर काळवाघे, ग्रा.पं.सदस्य स्वाती भालेराव,‎ माजी उपसरपंच विठोबा कळवाघे, गुलाबराव अंभोरे‎ यांच्यासह गावकरी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन‎ विशाल इंगळे यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...