आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील दहावीच्या परीक्षा केंद्र असलेल्या जिजामाता कन्या शाळेवर उर्दू शाळेचा शिक्षक कर्तव्यावर उशीरा पोहोचल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला होता. तसेच पेपर सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना उद्भवलेल्या अडी अडचणीत आवश्यक असलेले मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांनी दडपणाखाली पेपर सोडवल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. येथील जिजामाता कन्या शाळेवर दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र आहे. या केंद्रावर उर्दू व मराठी माध्यमाचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत. त्यामध्ये जवाहर उर्दू हायस्कूलचे जवळपास तीस पेक्षा जास्त विद्यार्थी असल्याने जवाहर उर्दू हायस्कूलच्या एका शिक्षकाची त्या परीक्षा केंद्रावर नियुक्ती करण्यात आली आहे.
वास्तविक पाहता परीक्षा केंद्रावर शिक्षकांना दहा वाजता तर विद्यार्थ्यांना साडेदहा वाजेपर्यंत पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान शुक्रवारी ३ मार्च रोजी मराठी विषयाच्या पेपरला जवाहर उर्दू हायस्कूलकडून नियुक्त करण्यात आलेला एक शिक्षक सकाळी सव्वा अकरा वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचला नाही. त्यामुळे नाइलाजास्तव केंद्र प्रमुखास त्यांच्या ठिकाणी इतर शिक्षकाची नियुक्ती केली. शिक्षक उशिरा परीक्षा केंद्रावर पोहोचल्यामुळे उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वी आलेल्या अडचणी ऐकून घेऊन त्यांचे निरसन करण्यासाठी उर्दू माध्यमाचे शिक्षक वेळेवर उपलब्ध नसल्याने विद्यार्थी गोंधळुन गेले होते.
तसेच मराठी माध्यमातील शिक्षकांना त्या विद्यार्थ्यांना व्यवस्थीत हाताळला न आल्याने विद्यार्थ्यांना दडपणाखाली पेपर सोडवावा लागला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कधीही न भरून निघणारे शैक्षणीक नुकसान झाले आहे. या बाबत इसा खान, मलंग शाह, शे. जावेद, शे. शफिक व म. इक्बाल या पालकांनी जवाहर उर्दू शाळेचे मुख्याध्यापक यांच्याकडे लेखी तक्रार करीत त्या शिक्षकावर कारवाईची मागणी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.