आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:केंद्र सरकारच्या दडपशाही विरूद्ध काँग्रेसचे आंदोलन ; खोट्या प्रकरणात अडकवण्याचे केंद्र सरकारचे षड्यंत्र

बुलडाणा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रातील भाजप सरकार मनमानी व अहंकारी असून विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून कारवाई करत आहे. काँग्रेस पक्ष अशा कारवायांना कधीही घाबरला नाही. या हुकूमशाही सरकारला काँग्रेस पक्ष, सोनिया व राहुल गांधी सातत्याने जाब विचारत असल्याने त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचे केंद्र सरकारचे षड्यंत्र आहे. परंतु अशा हुकूमशाहीला काँग्रेस पक्ष लोकशाही मार्गाने चोख उत्तर देईल. असा इशारा प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विजय अंभोरे यांनी दिला आहे.

येथील जिल्हा परिषदमधील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुतळ्यासमोर बैठा सत्याग्रह करीत काँग्रेस पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून आमचा आवाज दडपण्याचा भाजप सरकार प्रयत्न करीत आहे. परंतु भाजपा सरकारसमोर काँग्रेस कदापि झुकणार नसल्याचे ते म्हणाले. या धरणे आंदोलनात ज्येष्ठ नेते प्रा.संतोष आंबेकर, प्रदेश महिला सरचिटणीस नंदिनी टारपे, संगीता पवार, माजी सरचिटणीस दीपक रिंढे, माजी तालुकाध्यक्ष डॉ. पुरूषोत्तम देवकर, विनोद बेंडवाल, प्रदेश वक्ता सेलचे रवी पाटील, प्रदेश सेवादल उपाध्यक्ष गजानन लांडे पाटील, जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश खेडकर, श्लोकानंद डांगे, एकनाथ चव्हाण, किशोर साखरे, आसिफ भाई, राजीव काटीकर, विठ्ठल सोनुने, सुनील पनपालीया, डिगांबर अंभोरे, वैभव चव्हाण, सुरेश सरकटे यांनी सहभाग घेतला होता.

बातम्या आणखी आहेत...