आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाहीर निषेध:अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा मोर्चा

चिखली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपालिकेने अतिक्रमणधारकांवर केलेल्या कारवाईचा जाहीर निषेध करत, अतिक्रमणधारक तसेच लघु व्यावसायिकांच्या मागण्या प्रशासनाने मान्य करून पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी आणि नोटीस मागे घ्याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी सोमवारी केली. गोरगरिबांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी सांिगतले.

नगर परिषदेच्या नोटिसीमुळे धास्तावलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आमदारांच्या दबावाखाली अतिक्रमणधारकांना करत नोटिसा पाठवल्या. दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी या नोटिसीमुळे काही होणार नाही, काळजी करू नका असे सांगून नागरिकांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप यावेळी बोंद्रे यांनी केला. काँग्रेस शहराध्यक्ष अतहरोद्यीन काझी यांनी शहरातील धनदांडग्यांचे अतिक्रमण कायम असताना सर्वसामान्यांना अतिक्रमण हटवण्याच्या नोटीस देणे कितपत योग्य आहे, असा सवाल केला. अनेक वर्षांपासून ज्या घरात सुख-दुख अनुभवले अशा नागरिकांना आणि लहान-मोठा व्यवसाय करून परिवाराचे पालनपोषण करणाऱ्यांना नोटीस देण्यात आल्या. ही कारवाई अन्यायकारक आहे, असे माजी उपनगराध्यक्ष कुणाल बोंद्रे यावेळी म्हणाले. यावेळी डॉ. मोहम्मद इसरार, नीलेश अंजनकर, प्रदीप पचेरवाल आदींनी मनोगत व्यक्त केले.

मोर्चात पप्पू जागृत, नगरसेवक रफिक सेठ, आसिफ भाई, विलास कंटुले, गोकुळ शिंंगणे, राजू रज्जाक, गोपाल देव्हडे, विजय गाडेकर, अनिखाँ उस्मानखाँ, राहुल सवडतकर, जय बोंद्रे, अ‍ॅड. प्रशांंत देशमुख, सुरेश बोंद्रे, सचिन शेटे, आश्विन जाधव, कैलास जंगले, शहजादअली खान, खलील बागवान, सिराज काझी, शेख आरिफ, जकाभाई, अब्रार बागवान, जाकीर भाई, अमोल सुरडकर, भास्कर चांदोरे, आकाश गाडेकर, पवन रेठे, अजय गवारगुरू, अकील खान, समद जमदार, अक्रम बागवान, सागर खरात, आजी-माजी नगरसेवक तथा विविध सेलचे पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...