आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:दिल्लीत निदर्शने करणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना अटक ; केंद्र शासनाच्या विरुद्ध घोषणा

जानेफळ14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईडीच्या कारवाई निषेधार्थ दिल्लीत निदर्शने करणाऱ्या बुलडाण्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना आज १५ जून रोजी अटक करण्यात आली. नवी दिल्ली येथील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयासमोर राहुल गांधी यांना इडीने व मोदी शासनाने गैरप्रकार चौकशीसाठी बोलावले. त्यांना तीन दिवसांपासून त्रास देत असल्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे. राहुल गांधी यांच्यावरील कारवाई विरोधात संपूर्ण देशात व दिल्लीत जनआक्रोश उसळला असून मोठ्या प्रमाणात केंद्र शासनाच्या विरुद्ध घोषणा देऊन व निषेध करण्यात आला. या आंदोलनात बुलडाणा जिल्ह्यातील माजी जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव घुमरे, तालुकाध्यक्ष देवानंद पवार यांनी सहभाग घेतल्यामुळे त्यांना दिल्ली पोलिसांनी अटक करून नरेला या पोलिस ठाण्यात ठेवले आहे.

बातम्या आणखी आहेत...