आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निदर्शने:केंद्र सरकारच्या ईडी कारवाईविरोधात काँग्रेस पक्षाची खामगाव येथे निदर्शने

खामगाव12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकरी विरोधी धोरण यासह मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात सतत आवाज उठवला आहे. त्यामुळे केंद्रातील षडयंत्रकारी मोदी सरकार गांधी घराण्याला बदनाम करुन त्यांच्यामागे ईडीची चौकशी लावुन दडपशाहीचे धोरण अवलंबत आहे. केंद्रातील मोदी सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले जात आहे. केंद्र सरकारची ही हुकूमशाही कदापि खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी दिला आहे.

माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात सोमवारी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी व काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात केंद्रातील मोदी सरकारने षड्यंत्र रचून राजकीय सूडबुद्धीतून केलेल्या ईडीच्या कारवाईच्या विरोधात शहरातील जयस्तंभ चौकात धरणे आंदोलन करुन निदर्शने करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

बाजार समितीचे माजी मुख्य प्रशासक पंजाबराव देशमुख यांनी संचालन करुन मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात मार्गदर्शन केले. या धरणे आंदोलनात तालुका अध्यक्ष डॉ.सदानंद धनोकार, शेगाव तालुका अध्यक्ष विजय काटोेले, माजी नगरसेवक किशोरआप्पा भोसले, माजी जि.प.सभापती सुरेश वनारे, सुरेशसिंह तोमर, श्रीकृष्ण धोटे, सुभाष पेसोडे, परवेजखान पठाण, हाफीज साहेब, गब्बर भाई, किशोर राजपूत, सुरेश बोरकर, जसवंतसिंग शिख, पिंटू जाधव, तेहसीन शाह, अ‍ॅड.शहेजादउल्ला खॉ, सज्जादउल्ला खॉं, जयराम मुंडाले, माजी पं.स.उपसभापती चैतन्य पाटील, शिवाजीराव पांढरे, सुटाळा खुर्दचे सरपंच नीलेश देशमुख, ज्ञानेश्वर शेजोळे, निखिल देशमुख, प्रमोद चिंचोळकर, तुषार इंगळे, युवक काँग्रेसचे तुषार चंदेल, प्रशांत टिकार, शेख अन्वर, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष बबलू पठाण, अस्लम पटेल, राजू पटेल, हाफीज साहेब, हिदायतखान पठाण, राजू सदाफुले, कैलास साबे, बाळु इंगळे, शफाभाई, अनंता धामोळे, संतोष कान्हेरकर, अनंता माळी, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...