आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ११ जून रोजी ओबीसी संघर्ष मेळाव्याचे आयोजन केले आहे. राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली या मेळावा होणार आहे. ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कासाठी ११ जून रोजी बुलडाणा येथे ओबीसी मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्याला विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच बारा-बलुतेदार संघटनेचे प्रमुख तथा काँग्रेसचे प्रदेश महासरचिटणीस कल्याणराव दळे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आ. राहुल बोंद्रे, काँग्रेसचे सचिव माजी आ. हर्षवर्धन सपकाळ मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी ॲड. गणेशराव पाटील, आ. राजेश एकडे, दिलीपकुमार सानंदा, संजय राठोड, विजय अंभोरे, श्याम उमाळकर, रामविजय बुरुंगले, स्वाती वाकेकर, हाजी दादूसेठ, ॲड. जयश्री शेळके, धनंजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ओबीसी आरक्षण पूर्ववत करून निवडणुका घेण्यात याव्यात, ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना हावी, सावित्रीबाई फुले तथा महात्मा फुले यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा यासह ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. गर्दे हॉलमध्ये सकाळी ११ वाजता होणाऱ्या ओबीसी संघर्ष मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन खरात, मेळाव्याचे निमंत्रक दीपक देशमाने, आयोजक दत्ता काकस, समाधान दामधर यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.