आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्याची दुरुस्ती:रस्ता दुरुस्तीसाठी काँग्रेसचे खड्ड्यात बसून आंदोलन ;

मोताळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मोताळा ते नांदुरा या मुख्य मार्गावरील खड्डे बुजवून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी तालुका काँग्रेसच्या वतीने आठवडे बाजार ते बसस्थानक या मार्गावरील खड्ड्यात बेशरमाचे झाड लावून व खड्ड्यात बसून आंदोलन करण्यात आले. लेखी आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली.

मोताळा ते नांदुरा मार्गावरील आठवडे बाजार ते बसस्थानक या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले होते. परंतु बांधकाम विभागाने निवेदनाची दखल न घेतल्याने तालुका काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष गजानन मामलकर यांच्या नेतृत्वात शुक्रवारी या रस्त्यावरील खड्ड्यात बेशरमाचे झाड लावत खड्ड्यात बसून आंदोलन करण्यात आले आहे. जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती.

यावेळी प्रायव्हेट कंल्टन्सीचे मंगेश भाट यांनी तत्काळ खड्डे बुजवण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्याने या आंदोलनाची सांगता करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन मामलकर, सलीम बाबा, प्रदीप जैन, बुढन जमदार, शे. आसिफ, कैलास खर्चे, विजय सुरडकर, योगेश महाजन, पाचपांडे टेलर व वसीम चुनेवाले यांच्यासह असंख्य काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...