आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाढती महागाई, बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूवरील वाढवलेल्या जीएसटी आणि अग्निपथ योजनेच्या विरोधात शुक्रवारी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी, पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, भाजीपाला यांचे वाढलेले दर आणि त्यातच जीवनावश्यक वस्तूवर वाढलेली जीएसटी यामुळे सर्वसामान्य जनतेची जगणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारने देशातील युवकांच्या भविष्याचा कुठलाही विचार न करता हुकूमशाही पद्धतीने आणि घाईघाईत आणलेली अग्निपथ योजना ही युवकांचे भविष्य धोक्यात घालणारी योजना लागू केली आहे. न्याय व्यवस्था, ई.डी. यांचा दुरुपयोग सरकारने चालवला आहे.
त्याचा निषेध म्हणून आज सिंदखेड राजात सिद्धार्थ जाधव यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात दीपक ठाकरे, उल्हास भुसारे, प्रल्हाद वाघमारे, मदन आघाव,अतिश राठोड, राजू पाखरे, शेख कदीर शेख नजिर, कैलास मांटे, कडूबा पाखरे, गणेश भाग्यवंत, नामदेव राठोड, बाबुराव राठोड, संजय शेवाळे, ज्ञानेश्वर राठोड, राजू धोंगडे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मोताळ्यातही महागाई विरोधात काँग्रेसचे निवेदन
देशात पेट्रोल, डिझेल, गॅस, रसोई तेल, खाद्यपदार्थ, खते, बी-बियाणे तथा औषधी व इतर वस्तूंवरील वाढत्या महागाई विरोधात तालुका काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.लोकांचे महागाईमुळे जगणे कठीण झाले आहे. देशात डिझेल, पेट्रोल, रसोई गॅस, तेल, खाद्यपदार्थ, खते, बी बियाणे आणि औषधींच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. जीएसटीने महागाईत जनतेचे कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशात महागाई वाढत आहे. सर्वसामान्य हतबल झाले आहेत. तसेच अग्निपथ योजनेमुळे युवा वर्गात गैरसमज निर्माण झाला आहे. मुळात हो योजना युवक विरोधी आहे. त्यामुळे ही योजना बंद करून महागाई कमी करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गजानन मामलकर, तुळशीराम नाईक, शे. सलीम बाबा, गणेश पाटील, विलास पाटील, गणेशसिंग राजपूत, प्रकाश बस्सी, अरविंद पाटील, सुनील तायडे यांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.