आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानॅशनल हेरॉर्ल्ड प्रकरणात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना ईडीने समन्स बजावून गेली तीन दिवस ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलवले जात आहे. केंद्र सरकारच्या तपास संस्था या भाजपच्या मनमानी कारभाराने कामकाज करून कॉंग्रेस नेत्यांना नाहक बदनाम करून वेगवेगळया चौकशांच्या फेऱ्यात अडकवून ठेवत आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी व राहुल गांधीच्या समर्थनार्थ आज १७ जुन रोजी कॉग्रेस कार्यकर्त्यांनी येथील जयस्तंभ चौकात धरणे आंदोलन करून केंद्र सरकारच्या मनमानी कारभाराबाबत रोष व्यक्त केला.
या आंदोलनात काँग्रेसचे तालुका अध्यक्ष समाधान सुपेकर, शहराध्यक्ष अतहरोद्यीन काझी, जिल्हा सहकार सेलचे अध्यक्ष दीपक देशमाने, जिल्हा काँग्रेसचे विष्णु पाटील कुळसुंदर, डॉ. मोहंमद इसरार, माजी सभापती प्रकाश निकाळजे, जगन्नाथ पाटील, डॉ. सत्येंद्र भुसारी, अशोक पडघान, ज्ञानेश्वर सुरूशे, प्रदीप अंभोरे, राम डहाके, कुणाल बोंद्रे, सचिन बोंद्रे, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष किशोर सोळंकी, मनोज लाहुडकार, शहर अध्यक्ष पप्पू जागृत, किसान सेलचे अध्यक्ष समाधान गिते, सेवादलाचे तालुका अध्यक्ष गजानन परिहार, गट नेते आसिफ भाई, नगरसेवक दिपक खरात, विजय गाडेकर, राजू रज्जाक, दीपक थोरात, ईश्वर इंगळे, अॅड. प्रशांत देशमुख, विजय जागृत, नीलेश अंजनगर, शहेजाद अली खान, दीपक लहाने, कैलास खराडे, डॉ. अमोल लहाने, डॉ. रवींद्र कमळसकर, डिंगाबर देषमाने, जक्काभाई, जाकीर भाई, शेषराव सावळे, अनंता जाधव, पंजाबराव आंभोरे, लक्ष्मण भिसे, कैलास जंगले, दुर्गेश मोरे, अकील खान, नजीर कुरेशी, संजय गिरी, बाशिद जमदार, अजिमखान, भास्कर चांदोरे, आश्विन जाधव, गजानन वांजोळ, गौतम सोनटक्के, अजिम शेख, प्रकाश राठोड, प्रदीप मोरे, प्रताप कांबळे, बंडू तरळकर, रफिक शेख, देविदास काकडे, धनंजय देशमुख, राजू मोरे, मलिक जमदार, आरिफ भाई, प्रवीण पाटील, गुलाब पठाण, वसंता बारगळ, ज्ञानेश्वर पंचागे, यांच्यासह चिखली तालुक्यातील असंख्य कॉंग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.