आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील सोनाळा येथील श्री संत सोनाजी महाराज यात्रेच्या मुख्य दिवशी गुरुवार, १० नोव्हेंबर रोजी रथ मिरवणूक सोहळ्याची दहीहंडीने सांगता करण्यात आली. उत्सवा दरम्यान असंख्य भाविकांनी संत सोनाजी महाराजांवर श्रध्देचा अभिषेक केला.
मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे यात्रा महोत्सवात खंड पडला होता. परंतु यावर्षी निर्बंधमुक्त वातावरणात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. हा विलोभनीय सोहळा पाहून भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. श्री संत सोनाजी महाराज रथ मिरवणूक ९ नोव्हेंबरच्या रात्री बारा वाजता काढण्यात आली. नगर परिक्रमेनंतर आज १० नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता रथ नियोजित जागेवर आल्यानंतर गोविंदा गोविंदाच्या गजरात दहीहंडी उत्सव पार पडला.
यावेळी हजारो भाविक भक्तांनी दहीहंडी उत्सवात सहभाग घेतला होता. डोळ्याचे पारणे फेडणारा हा उत्सव पाहण्यासाठी लाखो भाविक सोनाळा नगरीत दाखल झाले होते. दहीहंडी झाल्यानंतर हजारो भाविकांनी १२१ क्विंटल ज्वारी, २१ पोते उडदाची डाळ, अंबाडीची भाजी असा महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसादाचे वितरण करण्यासाठी सोनाळा, टूनकी, बावनबीर, दानापूर, सगोडा यासह पंचक्रोशीतील युवकांनी आपली सेवा दिली. यात्रेदरम्यान पोलीस बंदोबस्त होता. यात्रेमध्ये आमदार डॉ. संजय कुटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रसेनजीत पाटील, काँग्रेस पक्ष नेत्या स्वाती वाकेकर यांनी यात्रेत येऊन सोनाजी महाराजांचे दर्शन घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.