आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोलाचा सल्ला:फसवणूक होवू नये म्हणून ग्राहकांनी सर्व व्यवहार जागरूक राहून करावेत; जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात अ‍ॅड. घाटे यांचे प्रतिपादन

संग्रामपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिकीकरणाच्या युगात वस्तू व सेवांची विक्री करण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. अशातच ग्राहक व विक्रेते यांच्यात बरेच अंतर आहे. अशा वेळी ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रमाण जास्त आहे. याकरता ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना हक्काविषयी जागरूक असणे आवश्यक आहे. जर फसवणूक होत असेल तर ग्राहक संरक्षण कायद्याचा उपयोग करून न्याय मिळवून घ्यावा, असे प्रतिपादन अॅड. प्रमोद घाटे यांनी केले. वरवट बकाल येथील महाविद्यालयात वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

पुढे अॅड. घाटे म्हणाले, ग्राहकांनी व्यवहार करताना ग्राहक संरक्षण कायद्यानुसार जे हक्क दिलेले आहेत. त्या हक्काचा उपयोग करून व्यवहार करावा ज्यामुळे फसवणूक होणार नाही. प्रत्येक ग्राहकांनी आपल्या हक्काविषयी जागरूक राहण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चौधरी तर प्रमुख अतिथी डॉ.सतीश राणे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सतीश राणे यांनी केले. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ मध्ये ग्राहकांचे अधिकार आणि हक्क याविषयी विस्तृत माहिती दिली. प्राचार्य डॉ.चौधरी यांनी ऑनलाइन वस्तू खरेदीचे व्यवहार करताना ग्राहक कसा फसवल्या जाऊ शकतो व फसवणूक झाल्यास न्याय मागण्यासाठी कशा पद्धतीचा आधार घेऊ शकतो याचे मार्गदर्शन केले.

संचालन वैष्णवी लाहुरकार यांनी तर आभार पूजा माकोडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता डॉ. संजय टाले, प्रा. सुरेश भालतडक, प्रा. नागेश इंगळे, रोशन भिलंगे, विजय दामोदर, सचिन मुंडे यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...