आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलनाचा इशारा‎:देऊळगावराजातील संजय‎ नगरात दूषित पाणी पुरवठा‎

देऊळगावराजा‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील संजय नगर भागात‎ नगरपालिकेच्या माध्यमातून दूषित‎ पाणी पुरवठा होत असल्याने‎ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले‎ आहे. पालिका प्रशासनाने तत्काळ‎ दखल घेऊन शुद्ध पाण्याचा पुरवठा‎ करावा, अशी मागणी शिवसंग्राम‎ संघटनेने केली आहे. आज, दि. ५‎ जानेवारी रोजी पालिकेच्या पाणी‎ पुरवठा विभागाला याबाबत निवेदन‎ देऊन तीव्र आंदोलनाचा इशारा िदला.‎ संजय नगर भागातील दूषित‎ पाण्याच्या मुद्द्यावर शिवसंग्राम‎ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी‎ नागरिकांसह पाणी पुरवठा विभागाचे‎ अधिकारी गोरे यांना निवेदन दिले.‎

यावेळी त्यांच्याशी चर्चा करून‎ समस्या मांडण्यात आली.‎ जलवाहिनी फुटल्याने नालीतील‎ सांडपाणी त्यामध्ये शिरून संजय नगर‎ भागात नळाद्वारे दूषित पाणी पुरवठा‎ होत आहे. याबाबत नागरिकांनी‎ अनेकदा पाणी पुरवठा विभागाला‎ माहिती देऊनही दखल घेण्यात आली‎ नाही. पालिका प्रशासनाविरोधात रोष‎ वाढत आहे. शिवसंग्राम संघटनेच्या‎ पदाधिकाऱ्यांनी आज गोरे यांची भेट‎ घेऊन चर्चा केली. नागरिकांचे‎ आरोगय धोक्यात आल्याने‎ नगर पालिका प्रशासनाने शुद्ध‎ पाण्याचा पुरवठा करावा, अन्यथा‎ तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा‎ इशारा त्यांनी दिला. निवेदनावर‎ शिवसंग्रामचे राजेश इंगळे, जहीर‎ पठाण, अजमत खान, शे. राजू‎ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...