आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्ववत भत्ता:शहरी आशा वर्कर्सचा कोरोना भत्ता पूर्ववत सुरू ठेवा; गायकवाड यांची मागणी

बुलडाणा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरी आशा वर्कर्सचा कोरोना भत्ता पूर्ववत सूरू ठेवण्यात यावा, अशी मागणी आशा वर्कर्स युनियनच्या वतीने जिल्हा अध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांनी आज मंगळवारी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्याकडे केली आहे. गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनानुसार, नगर परिषद अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानात ८ आशा वर्कर्स संपूर्ण शहरात गरोदर माता, स्तनदा माता व लहान मुलांचे लसीकरण आणि विविध प्रकारच्या आरोग्याची सर्वे ची कामे करतात. कोरोनाच्या भयावह परिस्थितीत आशा वर्कर्सनी आपल्या जिवाची पर्वा न करता समाजाची सेवा केली. त्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली. आपल्या देशातही विविध समाजिक संस्था संघटनांनी सुद्धा त्यांचे कौतुक केले. संघटनेने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी एक हजार रूपये महिना स्थानिक शेष फंडातून देण्याचे कबूल केले. परंतु एकच महिना हा प्रोत्साहन भत्ता देण्यात आला. त्यानंतर कोरोना संपल्याचे कारण सांगून हा भत्ता बंद करण्यात आला. आज दोन वर्षे झाले तरी शहरात कोरोनाचे रुग्ण निघत आहे. जर ८ लोकांना प्रत्येकी एक हजार रूपये महिन्याचे सर्वांना मिळून फक्त ८ हजार रूपये आशा वर्कर्सला देण्यासाठी नगरपरिषदे जवळ नाहीत. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळे एक हजार रूपये कोरोना प्रोत्साहन भत्ता आशांना पूर्ववत देण्यात यावा. अशी मागणी आशा वर्कर्स युनियनच्या वतीने जिल्हा अध्यक्ष पंजाबराव गायकवाड, विजया ठाकरे, रेखा इंगळे, छाया जाधव, विजया सोनपसारे, सुरेखा गायकवाड यांनी मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्याकडे आज मंगळवारी एका निवेदनाद्वारे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...