आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाला निवेदन:‘सर्वाेपचार’मध्ये कोविडमध्ये सेवा दिलेल्या कंत्राटी कामगारांना हटवले

अकाेला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) तथा सर्वाेपचार रुग्णालयात कोरोनाच्या संकटकाळात सेवा दिलेल्या कंत्राटी कामगारांचे काम बंद करण्यात आले असून, ६ ते ७ महिन्यांचे वेतन थकल्याने त्यांनी साेमवारी उपाेषण केले. याबाबत अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसतर्फे जीएमसी व जिल्हा प्रशसानाला नविेदन देण्यात आले. हे उपाेषण जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर करण्यात आले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात एका कंपनीने सन २०१७ पासून कंत्राटी पद्धतीने काही कामगारांची नियुक्ती केली. त्यानंतर गत जवळपास दाेन वर्षे कोविडच्या काळात जीवाची बाजी लावून कामगारांनी सेवा केली. मात्र १ जुलै २०२२ राेजीपासून सेवा ज्येष्ठता डावलून नवीन १० कामगारांची नियुक्ती करण्यात आली. मात्र ही प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आराेप अखिल भारतीय सफाई कामगार मजदूर काँग्रेसने नविेदनात केला आहे. उपराेक्त प्रकरणी ऑगस्ट महिन्यातही कामगारांनी आंदाेलन केले हाेते. मात्र जिल्हा प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर १४ ऑगस्टपासून आंदाेलन स्थगित करण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने ही बाब कंपनीशी संबंधित असल्याने चर्चा करून निर्णय घेण्यास सांगितल हाेते. मात्र अद्यापही याप्रकरणी ताेढाचा ताेडगा निघाला नाही. त्यामुळे साेमवारी आकाश जाधव, नीतेश वानखडे यांनी उपाेषण सुरू केले. कंपनीच्या प्रमुखांना सूचना देऊन मुदतीच्या आत सेवा ज्येष्ठतेनुसार पात्र कामगारांना कामावर रजू करून घेण्याचे आदेश द्यावेत, अशीही मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसने नविेदनातून केली आहे.

ही मागणीही पूर्ण हाेईना ः सध्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने कार्यांन्वित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या हॉस्पिटलसाठी मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. दरम्यान काेविड संकटात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रूजू करून घेण्यातबाबतचे शासनाचे धारणे असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कंत्राटी कामगारांना सेवेत रूजू करून घ्यावे. ही मागणी मान्य न झाल्यास आमरण उपाेषण करण्यात येईल, असा इशाराही ऑगस्ट महिन्यात आंदाेलकांनी दिला हाेता. आता पुन्हा कामगारांनी रूजू करून घेणे व वेतन देणे यासाठी उपाेषण केले.

बातम्या आणखी आहेत...