आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान; कठोर कारवाई करा

मोताळा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापुरुषांबद्दल वारंवार वादग्रस्त विधाने करून राज्यातील जनतेच्या भावना दुखावणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी कुल जमात तंजीमच्या वतीने तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींकडे १२ डिसेंबर रोजी निवेदनातून केली आहे.

सद्या देशात महामानवांचा अवमान करण्याची जणू स्पर्धा सुरू आहे. यात सुधांशू त्रिवेदी, प्रसाद लाड, चंद्रकांत पाटील यांचा समावेश आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे चंद्रकांत पाटील यांचा कुल जमात तंजीमच्या वतीने जाहीर निषेध केला. जाणीवपूर्वक वादग्रस्त विधान करून महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावणारे राज्यपाल कोश्यारी यांना तत्काळ पदमुक्त करावे, असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देताना शे. सलीम शे. याकुब, मो. शाबान, बुडन जमदार, शे. जमीर भाई, प्रशांत वाघोदे, गजानन मामलकर, साहेबराव डोंगरे उपस्थिती होते.

बातम्या आणखी आहेत...