आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांची मैत्री:विद्यार्थ्यांनी ॲपचे महत्व दिले पटवून; वापराची पद्धतही समजावून सांगितली

देऊळगावराजा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाला नवतंत्रज्ञानाची गरज आहे. दुर्दैवाने हे तंत्रज्ञान शहरापुरते मर्यादित राहते. परिणामी मोठ्या प्रमाणात जी लोकसंख्या गावखेड्यात राहते. त्यांना विकासाची संधी मिळत नाही. हे तंत्रज्ञान त्यांच्यासाठी वापरले जाणे गरजेचे आहे. कृषिदूतांनी शेतकऱ्यांची ओळख आपल्या हातात असलेल्या मोबाईलमधल्या एका छोट्याशा अॅपसोबत या उपक्रमाद्वारे करून दिली.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न असलेल्या येथील समर्थ कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षांच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कुंभारी येथे काळासोबत शेती करण्याच्या पद्धतीत तंत्रज्ञानाचा कसा वापर करावा, यासाठी या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

अॅपद्वारे क्षणाक्षणाला बदलणारे तंत्रज्ञान आणि बाजारभाव यांचा अभ्यास करून पुढच्या शेतमालाची आखणी शेतकऱ्याला करता आली तर शेतकऱ्याला मोठा फायदा मिळू शकतो. शेतकऱ्याचा वेळ आणि पैशाची सुद्धा बचत होते. तसेच शेतकऱ्यास चांगला मोबदला मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरायला हवी, असे या उपक्रमातून कृषिदूतांनी शेतकऱ्यांना पटवून दिले.

तंत्रज्ञान आणि शेतकरी यांच्यातला दुवा बनून या अडचणीवर मात एग्रोस्टार अॅप उपलब्ध आहे. त्याच बरोबर अॅग्रोवन, किसान सुविधा, किसान मार्केट यार्ड, अशा प्रकारचे विविध अ‍ॅप उपलब्ध आहेत, अशी माहिती कृषिदूतांनी शेतकऱ्यांना दिली. या उपक्रमासाठी प्राचार्य नितीन मेहेत्रे, समन्वयक प्रा. मोहजितसिंग राजपूत, कृषी उद्यान विद्या विभागाचे प्रमुख प्रा. लिकेश मेश्राम व इंगोले यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमात चैताली नागतोडे, आकांक्षा उरकुडे, अश्विनी ठवकर, सचिन आष्टणकर, कुणाल आगलावे, कृणाल काळे, रजत हुस्कल, प्रतीक चाफले, सागरचंद्र कोरे, अक्षय आढे, विकी अंधारे, शंतनु कोकाटे, अंकुश काटे हे कृषिदूत उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...