आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानधन:कोरोना काळातील थकीत मानधन देऊन पुनर्नियुक्ती द्यावी ; बच्चू कडू यांच्याकडे एका निवेदन

शेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरातील अंशकालीन शिक्षकांचे थकीत मानधन आणि कोरोना काळातील सानुग्रह मानधन देऊन पुनर्नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकेच्या एक हजार ८३५ शाळांमधील कार्यानुभव, कला, क्रीडा विषयासाठी साडेपाच हजार अंशकालीन निदेशक पुनर्नियुक्ती च्या प्रतीक्षेत आहेत. सर्वच विभागातील शिक्षण आणि सरकारी कर्मचाऱ्यांना पगार आणि सानुग्रह मानधन देण्यात आले. मात्र राज्यातील अंशकालीन निदेशकांवर शासनाची मेहर नजर झाली नाही. एव्हढेच नव्हे तर आतापर्यंत शिवाय त्यांच्या हक्काचे २०१९-२०२० या काळातील मानधन सुद्धा देण्यात आले नाही. कार्यानुभव, कला, क्रीडा या विषयाच्या अध्यापनासाठी असलेल्या अंशकालीन निदेशकांचे हक्काचे मानधन आणि कोरोना काळातील सानुग्रह मानधन देण्यात यावेत. तसेच येत्या २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी उच्च प्राथमिक शाळेत कार्यानुभव, कला, क्रीडा या विषयाच्या अध्यापनासाठी अंशकालीन निदेशकांची पुनर्नियुक्त्या करा, अशी मागणी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष जुबेर सहारा, बुढन जमादार, शेख सलीम मेंबर, फिरोज जमदार यांनी केली आहे. याविषयावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन बच्चू कडू यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...