आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉझिटिव्ह:कोरोनाचे 117 अहवाल निगेटिव्ह तर 1 पॉझिटिव्ह

बुलडाणा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलेल्या व रॅपिड चाचणी द्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ११८ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ११७ अहवाल कोरोना निगेटिव्ह आले असून ०१ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील एका अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोग शाळेतील ६५ तर रॅपिड टेस्टमधील ५२ अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे ११७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये शेगाव शहरातील एक नवीन संशयित व्यक्ती पॉझिटिव्ह आली आहे. तसेच एक रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आजपर्यंत ८१३४२८ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत ९८३३३ कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली आहे. सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या ९८३३३ आहे. आज रोजी ३१ नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ८१३४२८ आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ९९०४४ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी ९८३३३ कोरोनाबाधित रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...