आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:सागवन येथील भ्रष्टाचार, रस्ता कामासाठी ग्रामस्थांचे धरणे आंदोलन

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सागवन ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार व मंजूर होऊनही रखडलेल्या रस्ता कामासह घनकचरा व्यवस्थापनासाठी तुळशीनगरातील ग्रामस्थांनी धरणे आंदोलन केले. आंदोलना संदर्भात ग्राम पंचायत सदस्य ॲड. दशरथसिंग राजपूत यांनी सरपंच व सचिवांना निवेदन दिले होते. निवेदनात नमूद आहे की, पंधराव्या वित्त आयोगातून तुळशीनगर शिंदे चक्की ते शिवसाई पतसंस्थेपर्यंत काँक्रीट रस्ता मंजुर आहे.

यासाठी १० लाख रुपये मंजूर असून वारंवार विनंती करुनही उलट बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. सरपंच म्हणून बांधकाम करण्याची जबाबदारी व कर्तव्य असताना हेतुपुरस्सर काम टाळले जात आहे. हा प्रकार जनतेला वेठीस धरण्याचा आहे. सदर रस्ता रहदारीस धोकादायक आहे. दीड वर्षांपूर्वी १५ लाख खर्च करुन घंटागाड्या खरेदी केलेल्या आहेत. त्या नादुरुस्त अवस्थेत पडल्या आहेत. घनकचरा टाकण्यासाठी काय प्रयत्न केले ते जनतेसमोर उघड करावे. सरपंच पती सुहास वानेरे यांचा ग्रामपंचायत कारभारातील हस्तक्षेप बांधकाम हस्तक्षेप बंद करावा अशी मागणी करत प्रभाग क्रमांक ४ वर सतत अन्याय होत आहे. पाणी पुरवठा, पथदिवे, रस्ते दुरुस्ती, आरोग्य,

बातम्या आणखी आहेत...