आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकारी साखर कारखाना:‘वसंत’मधील भ्रष्टाचार; मुख्यमंत्र्याकडे चौकशीची मागणी करणार : आ. ससाने

उमरखेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बंद अवस्थेत असलेल्या ‘वसंत’ सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ व कार्यकारी संचालकाच्या गैरकारभाराची व आर्थिक अफरातफरीची थांबलेली चौकशी ही दप्तर दिरंगाईमुळे लांबणीवर पडलेली कलम ८३ अंतर्गत सखोल चौकशी करण्याची मागणी लवकरच मुख्यमंत्र्याकडे करणार असून दोषी असणाऱ्यांना गजाआड केल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे आमदार नामदेव ससाने यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.

पुढे बोलतांना आमदार नामदेव ससाने म्हणाले की, मागील ३ वर्षापासून वसंत बंद पडल्याने परिसरातील कास्तकारावर शोककळा पसरली होती. कारखाना सुरु व्हावा, यासाठी सर्व राजकीय मतभेद विसरून माजी आमदार राजेंद्र नजरधने, विजयराव खडसे यांनी आटोकाट प्रयत्न केले. त्याच धर्तीवर आम्ही शेतकरी हितासाठी प्रयत्न केला. याही वेळेस सर्व राजकीय नेते मंडळी यांना सोबत घेतले. कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या न्यायालयातील याचिकेत त्यांनी हरकत घेतली नसल्याने न्यायालयाने आदेश पारित करित कारखाना सुरु होण्यासाठी हिरवी झेंडी दिली होती.

बातम्या आणखी आहेत...