आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तंबाखूमुक्तीबाबत विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती करा‎

बुलडाणा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तंबाखू मुक्तीसाठी कायद्याच्या‎ अंमलबजावणी सोबत जनजागृती‎ महत्त्वाची आहे. यासाठी जिल्हास्तरीय‎ अंमलबजावणी पथकांनी कार्यवाही‎ करावी, तंबाखूमुक्त जिल्हा होण्यासाठी‎ शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा, वार्षिक‎ स्नेहसंमेलनात तंबाखू सेवन व‎ तंबाखूमुक्तीवर विद्यार्थ्यांमध्ये जाणीव‎ जागृती करावी, तसेच परिवहन मंडळाच्या‎ बसवर तंबाखू संबंधित घोषणा सुरू‎ कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी‎ डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी केल्या.‎ जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय‎ तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची त्रैमासिक‎ बैठक जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांच्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अध्यक्षतेत पार पडली. यावेळी ते बोलत‎ होते.

जिल्हा स्तरीय समन्वय समिती व‎ जिल्हास्तरीय अंमलबजावणी पथकाच्या‎ आढावा बैठकीला डॉ. यास्मीन चौधरी,‎ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मणिराम‎ राठोड, गुन्हे शाखेचे वानखेडे, अन्न व‎ सुरक्षा अधिकारी सोळंके, शिक्षण‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ विभागाचे अनिल अकाळ, श्रीमती राठोड,‎ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद टाले,‎ जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. खिरोडकर,‎ सलाम मुंबई फाउंडेशन महेंद्र सौभागे,‎ ब्रम्हकुमारी संचालक उर्मिला दीदी, राष्ट्रीय‎ तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा‎ सल्लागार डॉ.लता भोसले, समुपदेशक‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ लक्ष्मण सरकटे, सामाजिक कार्यकर्ता‎ अर्चना आराख, तनवीर पठाण उपस्थित‎ होते.

माता सुरक्षित तर घर सुरक्षित या‎ मोहिमेंतर्गत गर्भवती माता व इतर रुग्ण‎ यांची मुख-तपासणी करून तंबाखू‎ सेवनाबाबतचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन‎ करण्यात आले. यात दोन हजार ७८२‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ रुग्णांची तपासणी करून समुपदेशन‎ करण्यात आले. प्रभावी जाणीव‎ जागृतीसाठी विविध ठिकाणी आरोग्य‎ कॅम्प, व्यसन मुक्तीदूत, आयर्न मॅन नितीन‎ घोरपडे यांनी उपस्थित धावपटू विद्यार्थ्यांना‎ तंबाखूमुक्तीची शपथ दिली असल्याची‎ माहिती यावेळी देण्यात आली.‎

तीन महिन्यात तंबाखू प्रतिबंधात्मक अंतर्गत १४ हजाराची वसुली‎
जिल्हा अंमलबजावणी पथकाने गेल्या‎ तीन महिन्यांच्या काळात तंबाखू‎ प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत पानटप‎ ीचालक व नागरिकांवर कारवाई‎ करून १४ हजार ९७० रुपये दंड‎ स्वरुपात वसूल केले आहेत. तसेच‎ राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत‎ संपूर्ण जिल्हाभरात दंतरोग तपासणी,‎ क्षयरोग तपासणी, एड्स रुग्ण,‎ रक्तदाब, मधुमेह रुग्ण, रुग्णांचे‎ नातेवाईक यांना तंबाखू सेवन व‎ धुम्रपान याबाबत समुपदेशन करण्यात‎ येत आहे. अशी माहितीही या बैठकीत‎ देण्यात आली.‎

बातम्या आणखी आहेत...