आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिविगाळ:जातीवाचक शिविगाळ करणाऱ्या सात जणांविरुद्ध गुन्हा ; जीवे मारण्याची धमकी

किनगावराजा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतीच्या वादातून जातीवाचक शिविगाळ करणाऱ्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल दाखल केला. ताडशिवणी येथील रहिवासी नत्थू संतू मोरे वय ४९ हे शेतात साचलेले पाणी काढत असताना आरोपी शिवाजी विश्वनाथ शितोळे, रामकिशन विश्वनाथ शितोळे, भगवान शिवाजी शितोळे, माधव रामकिशन शितोळे, परमेश्वर उर्फ पिंटू जनार्धन शिंदे, संजय जयवंत शिंदे व शिवाजी अंकुश शिंदे यांनी नत्थु मोरे यांना जातीवाचक शिविगाळ केली तर माधव शितोळे याने त्यांच्या हातावर काठीने तर परमेश्वर शिंदे याने डोक्यावर वार केला. यावेळी मोरे यांची पत्नी व पुतण्या वाद सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही जातीवाचक शिविगाळ करून आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच विनायक दगडुबा देशमुख हे नाली काढताना आरोपींनी त्यांना शिविगाळ केली. पुढील तपास उपविभागीय पोलिस उपअधीक्षक विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार युवराज रबडे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...