आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:राष्ट्रवादीच्या आठ कार्यकर्त्यांवर गुन्हे

बुलडाणा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा पुतळा जाळल्याप्रकरणी शहर पोलिसांनी राष्ट्रवादीच्या आठ कार्यकर्त्यांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांच्याबाबत अब्दुल सत्तार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे बुलडाणा राष्ट्रवादीच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने व निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी येथील संगम चौकात राष्ट्रवादी बुलडाणा विधानसभा अध्यक्ष नरेश शेळके, तालुकाध्यक्ष डी. एस. लहाने यांच्यासह इतरांनी निषेध करीत पुतळा जाळला होता. याप्रकरणी शहर पोलिसांनी नरेश शेळके, डी. एस. लहाने, अॅड. सुमीत सरदार, अनुजा सावळे, पी. एम. जाधव, बावस्कर, सत्तार कुरेश यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...