आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:धुऱ्याच्या वादातून वेगवेगळ्या तीन घटनेत 10 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल ; शेतीच्या कारणावरून वाद

देऊळगाव राजाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळा जवळ येताच शेती धुऱ्याच्या वादातून झालेल्या तीन वेगवेगळ्या घटनेत दहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील प्रथम घटनेत रोहणा येथील देविदास हिम्मतराव ढोके यांच्या तक्रारीनुसार आरोपी ज्ञानेश्वर ढोके, कैलास ढोके व जनार्धन भानुसे यांनी शेतीच्या कारणावरून वाद घातला. शेताच्या मधात असलेल्या खुणा उपटू नका, असे मुलगा सांगावयास गेला असता आरोपींनी संगनमत करून माझ्यासह मुलाला मारहाण केली. तर दुसऱ्या घटनेत सुमन रंगनाथ तांबेकर रा. गिरोली बुद्रुक यांच्या तक्रारीनुसार गणेश तांबेकर, भागवत तांबेकर व किसन तांबेकर यांनी ट्रॅक्टरच्या साह्याने शेताचा धुरा कोरला. या बाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी सुमन तांबेकर यांच्या हातावर मारहाण केली. पती व मुलास धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली. तर तिसऱ्या घटनेत रोहणा येथील ज्ञानेश्वर कडूबा ढोके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कारभारी ढोके, देविदास ढोके व सुमनबाई ढोके यांनी संगनमत करून शेतातील धुरा रोवण्याचा कारणावरून शिविगाळ केली.

बातम्या आणखी आहेत...