आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदा झालेल्या मुबलक पावसामुळे प्रकल्पासह विहिरी तुडुंब भरल्या असून नदी-नाले खळखळून वाहत आहेत. याच पाण्याच्या भरवशावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १ लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी केली आहे. मुबलक पाण्यामुळे सिंचन हाेत असल्यामुळे शेत शिवार चांगलेच बहरले आहे. सध्या स्थितीत शेती मशागतीच्या कामाला वेग आला असून निंदणी व डवरणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. या कामामुळे ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला देखील काम मिळाले आहे.
यंदा शेतकऱ्यांनी जवळपास ७ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी केली होती. परंतु ही पिके काढणीवर येत नाही, तोच ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकाची नासाडी केली होती. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे खरीप उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला होता. सतत झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुध्दा निघाला नाही. तर दुसरीकडे याच पावसामुळे जिल्ह्यातील लहान मोठ्या प्रकल्पात मुबलक जलसाठा निर्माण झाला असून आजही नदी नाले खळखळून वाहत आहेत.
विहिरीला देखील मुबलक पाणी आहे. खरिपाची तुट भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी या पाण्याच्या भरवशावर १ लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्रावर गहु, हरभरा, करडी, मका, रब्बी ज्वारी आदी रब्बीची पेरणी करण्यात आली आहे. त्यापैकी सर्वाधिक १ लाख ३९ हजार हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याचा पेरा करण्यात आला आहे. रब्बी पिकासाठी मुबलक पाणी असल्यामुळे शेत शिवार चांगलीच बहरली आहेत.
सध्या स्थितीत शेती मशागतीच्या कामाला वेग आला असून निंदणी व डवरणीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. परंतु वेळेवर निंदणीसाठी मजुर मिळत नसल्यामुळे काही शेतकरी तनाचा नायनाट करण्यासाठी तण नाशकाचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे.
यंदा जिल्ह्यात झालेला रब्बीचा पेरा
यंदा जिल्ह्यात १ लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीचा पेरा करण्यात आला आहे. त्यामध्ये सर्वाधिक १ लाख ३९ हजार हेक्टर क्षेत्रावर हरभरा तर त्या खालोखाल २८ हजार ९५६ हेक्टरवर गहु, ६ हजार ५८२ हेक्टरवर ज्वारी, ७ हजार ३८६ हेक्टरवर मका, २७५.५० हेक्टरवर करडई, १५.२० हेक्टरवर सुर्यफूल व दहा हेक्टर क्षेत्रावर गळीत धान्याचा पेरा करण्यात आला आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून प्राप्त झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.