आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसळधार पाऊस:मुसळधार पावसाने केले पिकांचे नुकसान

संग्रामपूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे १० सप्टेंबर रोजी उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. या परिसरातील नुकसानीचा तात्काळ सर्व्हे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे.तालुक्यातील शिवणी, सोनबर्डी, आलेवाडी, लाडणापूर, वसाळी, पिंगळी, करमोडा, चिचारी, सालवन , दयालनगर , हडियामाल, सोनाळा यासह इतर भागात विजेच्या गर्जनेसह वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे.

त्यामुळे कपाशी, मका, सोयाबीन पीक पूर्णता जमीनदोस्त झाले आहे. तसेच इतरही पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून या पावसाचा परिणाम उत्पन्नावर देखील होणार आहे. तरी ऐन पीक उत्पन्न वाढीच्या बहरात असताना झालेला हा वादळी पाऊस शेतकऱ्यांसाठी मारक ठरला आहे. यासाठी महसूल विभागाने नुकसान झालेल्या पिकाचा तात्काळ सर्व्हे करून शेतकऱ्यांना मदती द्यावी, अशी मागणी या भागातील शेतकरी बांधव करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...