आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेशाची पायमल्ली:सैलानी बाबा यात्रेत गर्दीचा महापूर; 1000 हून अधिक जणांवर गुन्हे दाखल, संदल काढल्या प्रकरणी पाेलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

बुलडाणाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मार्ग सील करूनही हजारो भाविक सैलानीत दाखल

शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या पिंपळगाव सराई परिसरात भरणाऱ्या सैलानी यात्रेसह नारळाची होळी व संदल काढण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली होती. परंतु या बंदी आदेशाला झुगारून होळीच्या पाचव्या दिवशी म्हणजे शुक्रवारी रात्री हजारो भाविकांच्या उपस्थितीत संदल काढण्यात आला. त्यामुळे रायपूर पोलिसांनी १००० भाविकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच संदलच्या दिवशी सैलानीत गर्दी करणाऱ्या भाविकांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. राज्यासह परराज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या सैलानी येथे दरवर्षी मार्च महिन्यात सैलानीची यात्रा भरते. खऱ्या अर्थाने होळीच्या सणापासून या यात्रेला सुरूवात करण्यात येते. होळीच्या दिवशी या यात्रेत लाखो नारळांची होळी पेटवण्यात येते. नारळाची होळी पेटवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक सैलानीत डेरे दाखल होतात. तर होळीच्या पाचव्या दिवशी पिंपळगाव सराई येथून सैलानी बाबांचा संदल काढण्यात येतो.

या दिवशी संदलमध्ये सहभाग घेण्यासाठी राज्यासह परराज्यातील लाखो भाविक सैलानीत येतात. परंतु मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने सैलानी यात्रेसह नारळाची होळी व संदल काढण्यावर बंदी घातली होती. विशेष म्हणजे नारळाची होळी व संदलच्या दिवशी भाविकांनी गर्दी करू नये, यासाठी सैलानीकडे येणारे प्रमुख मार्ग सील करण्यात आले होते. परंतु तरी सुध्दा शनिवारी हजारो सैलानी भाविक सैलानीत दाखल झाले होते. यावेळी काही मुजावर व भाविकांच्या उपस्थितीत सैलानी बाबांचा संदल काढण्यात आला. यावेळी पोलिसांनी संदल मधील गर्दी हटवण्यासाठी भाविकांवर सौम्य लाठीचार्ज केला. प्रकरणी शासनाच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तहसीलदार रुपेश खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी किशोर मोरे यांच्या तक्रारीवरून रायपूर पोलिसांनी आरोपी शेख रफिक शेख करीम, शेख शफीक शेख करीम, हाजी हाशम शेख हबीब, शेख नजीर शेख कासम, शेख चांद शेख हबीब, शेख कदीर शेख नईम, शेख असलम शेख जहीर, शेख राजू शेख शहजाद यांच्यासह एक हजारांहून अधिक भाविकांवर गुन्हे दाखल करण्यात केले आहेत. पुढील तपास पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया व ठाणेदार सुभाष दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेंद्र मोरे हे करीत आहेत.

मार्ग सील करूनही हजारो भाविक सैलानीत दाखल
ंसंदलमध्ये सहभागी झालेले हजारो भाविक तर दुसऱ्या छायाचित्रात सैलानी बाबांच्या दर्ग्याचे दर्शन करण्यासाठी भाविकांनी केलेली गर्दी.
शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाची भाविकांवर कारवाई
नारळाची होळी व संदल हे सैलानी यात्रेचे वैशिष्ट्य आहे. या दिवशी हजारो भाविक सैलानीत डेरेदाखल होत असतात. परंतु या दिवशी सैलानीत भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने रायपूर पोलिस ठाण्यात बैठक घेऊन सैलानीकडे येणारे सर्व मार्ग सील करण्यात आले होते. परंतु तरी सुध्दा संदलच्या दिवशी हजारो भाविक सैलानीत दाखल झाले होते.

बातम्या आणखी आहेत...