आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री क्षेत्र जाळीचा देव यात्रेला ४ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून रविवार, ५ फेब्रुवारीला माघ पौर्णिमा असल्याने हा दिवस यात्रेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या यात्रेकरिता परराज्यातूनही भाविक येत असतात. बुलडाण्यापासून २५ किमी. अंतरावर तर जालना जिल्ह्यातील भाेकरदन तालुक्यात जाळीचा देवची यात्रा भरते. त्यामुळे यात्रेदरम्यान व्यवस्थापन करण्यासाठी जालना जिल्हा परिषद प्रशासन कमी पडत असते.
तर बुलडाणा पंचायत समितीकडून मढ या तालुक्यातील सीमेपर्यंत यात्रेचे व्यवस्थापन करण्यात येते. या यात्रेसोबतच लगतच्या श्री चक्रधर स्वामी चरणांकित स्थानांनाही यात्रेचे स्वरुप येते. नऊशे वर्षांपूर्वी महानुभाव पंथाचे संस्थापक अध्यक्ष सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी बुलडाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पदभ्रमण केले. त्यावेळी त्यांनी सनातनी धर्माविरुद्ध महिलांच्या शिक्षण व स्वातंत्र्यासाठी अनेकांना मार्गदर्शन केले. जळगाव खान्देश परिसरातही भ्रमण करत असताना श्री चक्रधर स्वामी चांगदेव हरताळ या भागातून श्री क्षेत्र सावळेद्वार येथे आले होते. तेथून जाळीचा देव येथे अजिंठा पर्वत रांगा चढून आले होते.
एसटीची चाके रुतली बुलडाणा जिल्ह्यातील विभागीय पातळीवर बसेसची संख्या कमी झाली आहे. दोन वर्षांपूर्वी कोरोना होता. त्यामुळे यात्रा भरली नव्हती. मात्र गतवर्षीपासून यात्रा सुरू झाली आहे. त्यावेळीही यात्रेसाठी एसटीकडे बसेस उपलब्ध नव्हत्या. आताही बसेस कमी झाल्याने यात्रा महोत्सवावर खासगी बसशिवाय पर्याय उरला नाही. बुलडाणा येथून जाळीचा देवला जाण्यासाठी प्रमुख मार्ग अमरावती, नागपूर, अकोला, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया यासह विविध भागातून भाविकांच्या गाड्या येत असल्याने त्यांचा परिणाम उलाढालीवरही पडत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.