आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सराफा बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; सराफा बाजार ग्राहकांनी फुलला, अक्षय तृतीयेला सोन्याचे भाव झाले कमी

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अक्षयतृतीयेच्या दिवशी बहुतांश नागरिक सोन्याची खरेदी करतात. परंतु दिवसागणिक वाढत जाणारी महागाई, शेत मालाला भाव नाही, सोन्याचे वाढलेले भाव याची तमा न बाळगता आज मंगळवारी ग्राहकांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्यासाठी सराफा बाजारात एकच गर्दी केली होती. सोने खरेदी व विक्रीच्या माध्यमातुन जवळपास जिल्ह्यात दहा ते पंधरा कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती आहे.

मागील कित्येक वर्षांपासून अक्षय तृतीयेला सोने खरेदीची परंपरा आहे. याच दिवशी लग्न कार्यासाठी असंख्य नागरिक सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी करीत असतात. त्यामुळे दरवर्षी जिल्ह्यातील सराफा बाजारात जवळपास दहा ते बारा कोटी रुपयाची उलाढाल होत असते. या दिवशी नागरिकांसह महिलांची सोने खरेदी करण्यासाठी झुंबड उडते. त्यामुळे अनेक सराफा दुकानात पाय ठेवायला जागा राहात नाही. शहरात दहा ते पंधरा लहान मोठ्या सराफा व्यावसायिकांची दुकाने आहेत.

परंतु यंदा शेतमालाला भाव नसने, दिवसा गणीक वाढत जाणारी महागाई, सोन्याचे वाढलेले भाव याची तमा न बाळगता ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर सोन्या चांदीची खरेदी केली आहे. सोने खरेदी विक्रीच्या माध्यमातुन जिल्ह्यात दहा ते पंधरा कोटी रुपयाची उलाढाल झाली आहे. सध्या सराफा बाजारात चोविस कॅरेट सोन्याचे भाव प्रतितोळा ५१ हजार ५०० रुपये तर २२ कॅरेट सोन्याचे भाव ५० हजार ५०० रुपये असे आहेत. दरम्यान, आज अक्षय तृतीयेला सोन्याचे भाव उतरल्यामुळे असंख्य ग्राहकांनी सोन्याची खरेदी करण्यासाठी सराफा बाजारात एकच गर्दी केली होती.

सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा प्रतिसाद
दोन दिवसापुर्वी सोन्याचे भाव वाढलेले होते. परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे ग्राहकांनी सोने खरेदीला चांगला प्रतिसाद दिला आहे. मागील दोन दिवसापेक्षा आज ग्राहकांचा सोने खरेदी कडे कल वाढला आहे.
संतोष वर्मा, सराफा व्यावसायिक

बातम्या आणखी आहेत...