आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहर व परिसरात मागील काही महिन्यांपासून पोलिस यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्यामुळे सर्वच प्रकारचे अवैध धंदे वाढीस लागले आहे. तसेच चोऱ्या व घरफोडीच्या प्रमाणात वाढ झाली असून प्रामुख्याने गर्दी व वर्दळीच्या ठिकाणी महिलांच्या अंगावरील दागिणे, घरफोड्या, शेत शिवारातील शेतमाल व जनावरांच्या चोऱ्यांमुळे नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी तात्काळ अवैध धंद्यांना आळा घालण्यात यावा अन्यथा काँग्रेस सेवादलाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा २० जून रोजी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, चिखली शहर व तालुकाभरात मागील अनेक महिन्यांपासून जुगार अड्डे, वरली मटका, विना परवाना अवैध दारू, गुटखा विक्री, इत्यादी अवैध धंद्याचे पीक जोरात आले आहे.
भुरट्या चोऱ्यासह धाडशी घरफोड्या इत्यादी गुन्हेगारी वाढीस लागली आहे. यात शहर परिसरात महिलांना रस्त्यावरून चालणे दुरापास्त झाले असुन त्यांच्या अंगावरील दागिण्या बरोबरच मोबाईल चोरीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. याचबरोबर भाव फरक व विविध आमिषे दाखवून शेतकऱ्यांच्या शेतमालाची चोरी व फसवणुकीचे प्रकरणी गुन्हेही दाखल झाले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक दहशतीत वावरत अाहे. तसेच यापूर्वी झालेल्या चोऱ्यांचा शीघ्र गतीने तपास करण्यात येवून परिसरातील अवैध धंदे तत्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस सेवादलाचे तालुकाध्यक्ष गजानन परिहार, समाधान सुपेकर, किशोर सोळंकी, समाधान गिते, ईश्वरराव इंगळे, भारत खासभागे, ज्ञानेश्वर पंचागे, प्रवीण पाटील, पंजाबराव अंभोरे, शेख अजिम शेलुद, प्रदीप मोरे, लक्ष्मण भिसे, गोपाल पवार, महादू भालेराव, दशरथ क्षीरसागर आदींनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.