आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकलने रवाना:1 हजार सिडबॉल घेऊन सायकलपटू रवाना; स्टॅच्यू ऑफ युनिटीला सायकलने  रवाना

बुलडाणा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टॅच्यू ऑफ युनिटीला सायकलने जाणाऱ्या सायकलपटूला १००० सिडबॉल देऊन ३ एप्रिल रोजी सकाळी ४ वाजता जयस्तंभ चौक येथून स्टॅच्यू ऑफ युनिटीला सायकलने जाणाऱ्या वन्यजीव सोयरे यांनी सिडबॉल देवून रवाना केले.

मलकापूर, जळगाव, पद्मालय गणेश मंदिर, धरणगाव, अमळनेर, सिंदखेडा, नंदुरबार, अक्कलकुआ, देडीपाडा, वाडीपाडा, राजपीपला, गरुडेश्र्वर, स्टॅच्यू ऑफ युनिटी एकूण ५७५ किलो मीटर सायकल चालवत संजय मयुरे, संदीप मुंढे, सरदारसिंग ठाकूर,विष्णू गाडे, गणेश देवरे, दीपक पैठणे, मापारी, जिंतूर सायकल चालवत जाणार आहे. या प्रवासात वन्यजीव संवर्धन, रक्षण आणि संवर्धनाचे संदेश देणार आहे.

यावेळी मंदार नाईक, प्रकाशकाका डब्बे आणि नितीन श्रीवास्तव यांनी त्यांना रवाना केले आहे. यावेळी वन्यजीव सोयरे आर्या नितीन श्रीवास्तव, नैतिक नितीन श्रीवास्तव, विनायक वायाळ, अखिलेश शेळके, संजय मयुरे, गणेश श्रीवास्तव, भागवत, प्रकाशकाका डब्बे, नितीन श्रीवास्तव यांनी रस्त्याने फेकण्यासाठी एक हजार सिडबॉल बनवून दिले.

बातम्या आणखी आहेत...