आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रोटरी क्लबच्या वतीने सायक्लोथॉन स्पर्धा उत्साहात

खामगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोटरी क्लब खामगावच्या वतीने २० नोव्हेंबर रोजी सायक्लोथॉन स्पर्धा रिझन ३ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ५०० च्या वर स्पर्धकांनी सहभाग घेतला होत. थंडीतही स्पर्धकांनी हिरीरीने भाग घेत ५, १०, २०, ४० किलोमीटर स्पर्धेत भाग नोंदवला. येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानावरून सकाळी सहा वाजता या स्पर्धेला प्रारंभ झाला होता.

या स्पर्धेवेळी गुजराथ अंबुलाचे ब्रिजमोहन चितलांगे, उज्ज्वला घुले, राजेश राऊत यांनी स्पर्धेला हिरवी झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. बक्षिस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षपदी रोटरी क्लब खामगावचे अध्यक्ष अलोक सकळकळे यांनी भूषवले होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आ.आकाश फुंडकर, रोटरी क्लबचे अनिरुध्द पाडलीवाल यांची उपस्थिती होती.

यावेळी आ.आकाश फुंडकर म्हणाले की, आजच्या धकाधकीच्या जीवनात लोक व्यायामाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे अनेकांना वेगवेगळ्या व्याधींनी ग्रासले आहे. जर शरीर निरोगी ठेवावयाचे असेल तर प्रत्येकाने व्यायामाची कास धरली पाहिजे, सायकल चालविली पाहिजे असे त्यांनी सांगितले. तसेच पुढील स्पर्धेत आपण देखील सहभागी होवू असा मनोदय व्यक्त केला. तसेच अनिरुध्द पाडलीवाल यांनी रोटरी क्लबच्या कार्याची माहिती देवून कार्याचे कौतुक केले.

यावेळी वयाच्या ७७ व्या वर्षी सायकलवरून भारतभ्रमण करणारे पांडुरंग भालेराव यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुलीमध्ये प्रथम दीपाली जाधव मेहकर,िद्वतीय गौरी टाके खामगाव, तृतीय क्रमांक वनश्री देशमुख तर पाच कि.मी.चौदा वर्षावरील मुले गटात प्रथम लौकीक घिवे खामगाव, द्वितीय सिद्धेश्वर पाटील खामगाव, पाच कि.मी. तीस वर्षावरील महिला गटात प्रथम मोनल चोपडा, द्वितीय श्वेता मोटवानी, तृतीय रेश्मा बुलानी खामगाव, दहा कि.मी.चाळीस वर्ष पुरुष वयोगटात प्रथम अहेमद खाँ नांदेड, द्वितीय डॉ.प्रमोद जाधव मेहकर, तृतीय हितेश जैन खामगाव, १० कि.मी. १४ वर्षावरील मुली गटात प्रथम क्रमांक वैष्णवी सातव, द्वितीय कोमल गळगटे खामगाव, तृतीय प्रगती क्षीरसागर खामगाव, मुले गटात प्रथम सुमित बढे अमरावती, द्वितीय गुलाब झोटे नागपूर, तृतीय प्रेम मोहोकार अमरावती, तर २० कि.मी.खुल्या गटात प्रथम शेख खद्दस नांदेड, द्वितीय मिथुन जाधव परभणी, तृतीय आशिष बोरकर हिंगोली, ४० कि.मी.खुल्या गटात प्रथम राजेश जाधव परभणी, द्वितीय राजेश मुळे, तृतीय क्रमांक शेख रहेमान नांदेड यांनी पटकावला आहे.

या सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सायकल स्पर्धेचे प्रोजेक्ट चेअरमन विनीत लोडास होते. तर कार्यक्रमाचे संचालन नितीन शाह, सौरभ चांडक यांनी केले. तर आभार मुकुंद मोटवानी यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...