आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्याच रणसंग्राम:मेहकर तालुक्यातील थोर क्रांतिकारक दादासाहेब सोमण

हिवरा आश्रम / शिवप्रसाद थुट्टे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात अनेक क्रांतिकारक व समाज सुधारकांचे मोलाचे योगदान राहिले आहे. घरादारावर तुळशीपत्र ठेवत सर्व सुख सोयी उपलब्ध असतानाही भारत मातेला गुलामगिरीच्या दुष्टचक्रातून मुक्त केले. दादासाहेब यांचे पूर्ण नाव व्यंकटेश केशव सोमण हे होते. त्यांचा जन्म १८८५ मध्ये वडद ता गुहागर जि.रत्नागिरी येथे झाला. सोमण घराणे जरी कोकणातले असले तरी त्यांची कर्मभूमी मेहकर आहे. लहानपणीच दादासाहेबांचे वडील मेहकरला आले. त्यामुळे दादासाहेब सोमण यांना मेहकर व शेजारच्या परिसराची खडानखडा माहिती होती. दादासाहेब सोमण याच्या घरात प्रचंड श्रीमंती असतांना ही त्यांनी आयुष्यभर खादी वापरुन या खादीचा मेहकर तालुक्यात प्रचार व प्रसार केला. ते मेहनती, बुध्दिमान, व्यासंगी, अभ्यासू, स्वावलंबी व मनाने उदार व उत्तम वक्ते होते.

राष्ट्रीय चळवळीचा प्रचार करतांना त्यांची वाणी मुक्तपणे संचार करीत होती. ते सतत भारत मातेच्या स्वतंत्रतेचे गाणे गुणगुणत असत. हे घनश्याम श्रीराम वदात्माराम, पक्षी तरूवर गाती स्वच्छंदे,मग आम्हास का, पारतंत्र्यात कोंडिले हे गाणे गात असत. जीवसृष्टीतील पक्षी सुध्दा स्वतंत्र आहेत. मग आम्ही पारतंत्र्यात आहोत देवा हे बरोबर नाही, असा प्रश्न ते या गीतातून करीत होते. दादासाहेबांवर लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा प्रभाव होता. टिळकांच्या चतुसुस्त्री मधील राष्ट्रीय शिक्षण हे एक तत्व होते. मेहकर व परिसरातील लोकांना राष्ट्रीय शिक्षण मिळावे या हेतूने काही लोकांनी एकत्र येत मेहकर एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्यामध्ये दादासाहेब सोमण अग्रस्थानी होते. याच सोसायटीचे सचिव म्हणून दादांचे वंशज हर्षल सोमण कार्यरत आहेत. आज ही शाळेतून राष्ट्रीय शिक्षण, स्वावलंबन, नितीमत्ता, शिस्त व संस्कार देणारी शाळा म्हणुन जनतेची मान्यता आहे. शेकडो सैनिक या शाळेतून घडले आहेत. दादांच्या आचार विचार व उच्चारावर सर्वांचा विश्वास होता. ते जे सांगायचे ते राष्ट्रहिताचे असणार, अशी अधिमान्यता त्यांना मिळाली होती.

बातम्या आणखी आहेत...