आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्थांचे उपोषण:विविध मागण्यांसाठी दादगाव ग्रामस्थांचे उपोषण

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गावातील सुटलेल्या बांधकामाचा मोबदला देण्यात यावा, गावाचे पुनर्वसन निमगाव शिवारात करण्यात यावे, मोजणीतून वगळलेल्या घराचा, शेतीचा व अतिक्रमण धारकांना मोबदला देण्यात यावा, यासह इतर मागण्यासाठी नांदुरा तालुक्यातील दादगाव येथील ग्रामस्थांनी आज १ नोव्हेंबरपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सूरूवात केली आहे.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनानुसार, उपरोक्त मागण्यांसाठी २७ सप्टेंबर रोजी प्रशासनाकडे अर्ज दाखल केला होता. परंतु दोन महिने होवून त्या अर्जावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. यावरुन दादगाव हे गाव इतर पुनर्वसित गावाच्या मानाने शासन स्तरावर दुर्लक्षित झाल्याचे दिसून येत आहे. घराचे पैसे मिळून दोन वर्षे झाले तरी अद्याप गावठाण संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

अशीच टोलवाटोलवी झाल्यास गावकऱ्यांकडे घर बांधण्यासाठी एक रुपया सुद्धा राहणार नाही. गावातील जास्त जमीन ही लाभीत असल्याने गावकऱ्यांना राहण्यासाठी निमगाव शिवारातील जमीन योग्य आहे. त्यामुळे गावाचे पुनर्वसन निमगाव शिवारातच करून घराचा, शेतीचा व अतिक्रमण धारकांना मोबदला देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात गणेश काटे, मुरलीधर काटे, हरिभाऊ वेरुळकर, रामकृष्ण धुळे, गुलाबराव आसलकार, उखर्डा धुळे, पुंजाजी पातुर्डे, महादेव तेलंग, काशीराम तेलंग, राजू चापके, नारायण सोनुने, विश्वनाथ तेलंग, सुनील तेलंग, हरिदास धुळे, सोपान धुळे, कमलाकर भोंगे, शिवदास आसलकार यांच्यासह असंख्य ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...