आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डफडे बजाओ आंदोलन:पार्डीच्या शेत रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी डफडे बजाओ आंदोलन

लोणार22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शारा गावातून पारडी गावाकडे जाणाऱ्या शेत रस्त्यावर गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे हे अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्यात यावा, या मागणीकडे सरंपच, सचिव व तलाठ्याचे लक्ष वेधण्यासाठी डॉ. अनिल मापारी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी डफडे बजाओ आंदोलन केले. शारा गावातून पारडी गावाकडे जाणाऱ्या शेत रस्त्यावर गावातील नागरिकांनी बाथरूम, शौचालय, ओटे बांधून अतिक्रमण केले आहे. तसेच घराचे काम करताना उरलेला मुरूम, वाळू रस्त्यात टाकून चाळीस फुटाचा रस्ता अरुंद करून वीस फुटापर्यंत आणला आहे. यापूर्वीचे सरपंच भागवत डव्हळे यांनी रस्त्यावरील अतिक्रमण काढून शेतकऱ्यांना येण्याजाण्यासाठी रस्ता खुला केला होता. परंतु, नवीन सरपंच आल्यापासून गावातील नागरिकांनी पुन्हा अतिक्रमण केले आहे. याबाबत वेळोवेळी सरपंच, सचिव, तलाठी यांच्याकडे शेतकऱ्यांसह गावकऱ्यांनी मागणी केली. परंतु त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने सरपंच, सचिव, तलाठी यांचे याकडे लक्ष वेधण्यासाठी डॉ.अनिल तेजराव मापारी यांच्या नेतृत्वात डफडे बजाव आंदोलन केले.

बातम्या आणखी आहेत...