आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चा:स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा तहसील कार्यालयावर ‘डफडे’ मोर्चा

सिंदखेडराजा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कालबाह्य झालेल्या ई पॉश मशीन बदलून देण्यात याव्यात, यासह इतर मागण्यांसाठी तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने आज १ एप्रिल रोजी येथील तहसील कार्यालयावर डफडे मोर्चा काढण्यात आला.

राजवाडा परिसरातून सुरू झालेल्या या मोर्चात तालुक्यातील शेकडो स्वस्त धान्य दुकानदार सहभागी झाले होते. शहराच्या प्रमुख मार्गावरून निघून हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. त्यांनंतर तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये पाच वर्षांपूर्वी राज्यात स्वस्त धान्य वाटप कार्यक्रमात अमुलाग्र बदल झाले.

२०१७ मध्ये वाटप झालेल्या मशीन आता कालबाह्य झाल्या आहेत. ग्रामीण भागात तर या मशीन चालत सुध्दा नाहीत. स्वताचा मोबाइल इंटरनेट वापरून या मशीन चालवाव्या लागत आहेत. सध्या फोर जी युग असताना स्वस्त धान्य वाटपात मात्र जुन्याच मशीनचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे दुकानदारासह लाभार्थ्यांचा वेळ आणि पैशाचा अपव्यय होत आहे. त्यामुळे शासनाने त्वरित मशीन बदलून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

या डफडे मोर्चात स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष उद्धव नागरे, जिल्हा उपाध्यक्ष विलास असोलकर, वसंत शेळके, संतोष जयस्वाल, मनोहर कायांदे, पी.एम.देशमुख यांच्यासह तालुक्यातील १२३ स्वस्त धान्य दुकानदार सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...