आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखो रुपयांचे नुकसान:गॅस सिलिंडरच्या स्फोटात दालमील मशीन खाक ; पोलिसांनी घेतली घटनेची दखल

मोताळा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका टिनशेडमध्ये असलेल्या गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट होऊन टिनशेडमध्ये असलेली नवीन दालमील मशिनरी, बॉयलर मशीन जळून खाक झाली आहे. या घटनेत मालकाचे जवळपास सात लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना ४ सप्टेंबरला सकाळी ८ वाजेच्या सुमारास बोराखेडी शिवारात घडली. या प्रकरणी तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.

येथून जवळच असलेल्या बोराखेडी शिवारात देशपांडे यांच्या गट क्रमांक ४६ मध्ये रेखा सुरडकर यांचा तीन नंबरचा प्लॉट आहे. त्याठिकाणी बिअर शॉपीच्या बाजूला रेखा सुरडकर यांचे टिनशेड आहे. या टिनशेडमध्ये दालमील मशीन आणि बॉयलर मशीन असे इतर साहित्य होते. दरम्यान रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास रेखा सुरडकर व त्यांच्या मुलाने गॅस सिलिंडरवर चहा केला. त्यानंतर ते गॅस सिलिंडर बंद करून काही कामानिमित्त गावात गेले होते. दरम्यान ८ च्या सुमारास टिनशेडमधील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. ही माहिती सुरडकर यांना शेजाऱ्यांनी दिली. माहिती मिळताच रेखा सुरडकर यांनी शेडमध्ये जाऊन पाहिले असता टिनशेडमध्ये असलेली नवीन दालमील मशीन, बॉयलर मशीन, घरगुती साहित्य जळून खाक झाले हाेते. या घटनेत त्यांचे जवळपास सात लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच बोराखेडीचे पीएसआय अशोक रोकडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक यशवंत तायडे व पोकॉ प्रमोद साळोख यांनी पंचनामा केला.

बातम्या आणखी आहेत...