आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुलडाणा येथील येळगावचे धरण यापूर्वीच शंभर टक्के भरले आहे.त्यातच १८ व १९सप्टेंबर रोजी बुलडाणा येथे पडलेल्या मुसळधार पावसामुळे येळगाव धरणाचे स्वयंचलित गेट उघल्याने पैनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांचे शेतीपीकाचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून मदत देऊ करावी अशी मागणी सवणा,दिवठाणा येथील शेतकऱ्यांसह स्वाभिमानी चे विनायक सरनाईक,भगवानराव मोरे यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे. मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले की, पैनगंगा व रामनदी काठच्या शेतकऱ्यांच्या शेतीपीकाचे पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ८ सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी. पैनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांचे कायमस्वरुपी नुकसान टाळण्यासाठी येळगाव धरणातील ५ गेट काढून सांडवा तयार करण्यात यावा.
रामनदी काठच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी,यासह आदी मागण्या स्वाभिमानीचे विनायक सरनाईक, भगवानराव मोरे, सखाराम भुतेकर, फिरोज खाण,सतीश सुरडकर, प्रल्हाद देव्हडे, रामेश्वर चिकणे, संजय हाडे, परसराम भुतेकर, तुकाराम होगे, भगवान देव्हडे, शिवशंकर माने, उमेश सुरडकर, प्रकाश पवार, विष्णु हाडे, दत्तात्रय करवंदे, उत्तम करवंदे, विठ्ठल वसु, नारायण भुसारी यांच्यासह सवणा, दिवठाणा येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.