आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपघात:ट्रकने कट मारल्याने‎ बसचे नुकसान‎

मोताळा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाठीमागून येणाऱ्या ट्रकने समाेर असलेल्या‎ एसटी बसला कट मारल्याची घटना खडकी फाट्याजवळ‎ काल २ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास‎ घडली. या घटनेत बसचे जवळपास वीस हजार रुपयांचे‎ नुकसान झाले आहे प्रकरणी बस चालकाच्या तक्रारीवरून‎ बोराखेडी पोलिसांत ट्रक चालकाविरुद्ध अदखल पात्र‎ गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.‎

बसचालक विलास खिल्लारे यांनी दिलेल्या‎ तक्रारीनुसार ते २ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजेच्या‎ सुमारास एम.एच. ०६ /एस. /८०३० क्रमांकाची बस घेऊन‎ बुलडाणा ते गूगळी जात होते. सकाळी अकरा वाजेच्या‎ सुमारास खडकी फाट्याजवळ प्रवासी घेण्यासाठी बस‎ थांबविली असता पाठीमागून एम. पी. ०९ /एच.एच. /३८२९‎ या क्रमांकाच्या ट्रक चालकाने बसला कट मारला.‎

बातम्या आणखी आहेत...